
स्वातंत्र्य पुर्व काळात अंदाजे १९२० साली ब्रिटीश राजवटीत श्री. काशिनाथ टिकार यांनी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी टेलरिंग व्यवसायाला सुरवात केली. त्यानंतर पुढील पिढीत त्यांचे चिरंजीव श्री. नानासाहेब टिकार यांनी ती परंपरा चालू ठेवली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात खाडीचे कपडे जाकेट, कोट शिवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार्यंचे कपडे शिवत असत.

मा. शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा प्रथम अमेरिकेत जाणार होते त्यावेळी त्यांचा कोट श्री. नानासाहेब टिकार यांनीच शिवला. तसेच भारताचे संरक्षण मंत्री मा. शंकररावजी चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, मा. मोहनजी धारीया व त्या समकालीन नेत्यांपासून आत्ताचे सोनेरी आमदार मा. रामेशजी वांजळें पर्यंत अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांचे कपडे शिवण्याची संधी मिळाली.

त्यानंतर श्री. नानासाहेब टिकार यांचे चिरंजीव राजाभाऊ टिकार यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवत सध्याच्या वस्तुत १९७७ पासून हा व्यवसाय पुढे चालू ठेवला.

तेथील वस्तूचे नुतनीकरण करून १९९४ साली तत्कालीन पुण्याचे महापौर मा. अलीजी सोमजी यांच्या हस्ते उद्घाटन केले पुढे टिकार घराण्यातील चौथी पिढी श्री. प्रशांत टिकार यांनी हि परंपरा चालू ठेवली. आपले लक्ष चित्रपट सृष्टीकडे वळवत चित्रपट क्षेत्रातील देखील अनेक दिग्गज कलाकारांचे कपडे शिवण्यास सुरवात केली.
चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर गीता गोडबोले, नुपूर नायर, कल्याणी कुलकर्णी - गुगळे, रश्मी रोडे, श्रुतिका बसवे,नमिता गोगटे यांच्या सोबत काम केले. देवूळ, मसाला, शाळा, चिंटू, पीत्रॠण, बाझी. या व अशा अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मराठी टिव्ही सिरियल्स व इव्हेंट्स मधील कलाकारांचे कपडे शिवले आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, भारत जाधव, अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, आनंद इंगळे, वैभव मांगले, समीर धर्माधिकारी, मिलिंद शिंदे (तांबडेबाबा ), जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचे ड्रेस शिवायची संधी मिळाली.

प्रोडक्ट्स


